Pandharpur Election Results : राष्टवादीला पछाडून नवव्या फेरीअखेर भाजपच्या समाधान आवताडेंची आघाडी

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळी आठ वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर होते. यामध्ये भगीरथ भालके यांना २३१० मते, समाधान आवताडे यांना १३७२ मते, तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ३० मते पडली आहेत.

त्यानंतर, पाचव्या फेरीअखरे भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर भालकेंची पिछेहाट झाली असून आता नवव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतर समाधान आवताडेंनी चांगलीच आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. आवताडे यांना नवव्या फेरीअखेर 2357 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.