Pandharpur News : पंढरपुरात पार पडला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा

एमपीसी न्यूज- काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात  श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न ( Pandharpur News ) झाला.मंगल अक्षता,सनई चौघडे आणि वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा शाही पद्धतीने पार पडला.

या विवाह सोहळ्याकरीता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्रे परीधान करण्यात आली होती.रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने,नथ,हिरवा चुडा आदी अलंकारांनी सजविले गेले. अलंकाराने सजविलेल्या उत्सव मूर्तींना विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी आणून मुंडावळय़ा बांधण्यात आल्या.

Pune News : कागदपत्रे देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याला अटक

वऱ्हाडी मंडळी म्हणून भाविकांच्या उपस्थितीत अंतरपाट धरला गेला. मंगलाष्टका म्हणण्यात आल्या.अशा मंगलमय वातावरणात श्री विठ्ठल व रखुमाईचा विवाह सोहळा संपन्न झाला.

संपूर्ण देऊळ विविध रंगेबेरंगी फुलांनी आकर्षक सजविण्यात आले होते.एकनाथ महाराजांच्या रुक्मिणी स्वयंवरात वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, असा उल्लेख आहे.

मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,मंदिर समितीचे सदस्य यांच्यासह भाविक या ( Pandharpur News ) विवाह सोहळय़ास संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.