_MPC_DIR_MPU_III

Pandharpur News : मंदिरं खुली होणार, आठ दिवसात नियमावली, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन – प्रकाश आंबेडकर

मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन अखेर थांबवण्यात आले.

एमपीसी न्यूज – लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकारकडून नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील, अशी महिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

_MPC_DIR_MPU_IV

मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन अखेर थांबवण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी दर्शन घेतलं. 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो.

आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं आपण समजुया, असं आंबेडकर म्हणाले. लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार, असंही ते म्हणाले.

आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत.

_MPC_DIR_MPU_II

लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी दर्शन घेण्यासाठी म्हटलं होतं. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, असं आंबेडकर यावेळी म्हणाले.

सरकार जर निर्णय घेत नसेल तर जनतेने निर्णय घ्यायचा असतो.सरकारने सुरुवातीलाच वारकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आंदोलनाची वेळ आली नसती.

संजय राऊत यांनी आजच्या आंदोलनावर केलेलं वक्तव्य म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण नाहीये. लोकशाहीत सरकारने कृती केली नाही की जनता ती करते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.