Pt. Jasraj Passed Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जयराज यांचे अमेरिकेत निधन

एमपीसी न्यूज – नामवंत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले पंडित जसराज 90 वर्षांचे होते.

पंडित जसराज यांच्या कन्या दुर्गा जसराज यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. दुर्गा जसराज म्हणाल्या, “आम्हाला मोठ्या दुःखाने हे कळवायचे आहे की, संगीत मार्तंड पंडित जसराज यांनी अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे पहाटे 5: 15 वाजता अखेरचा श्वास घेतला.”

पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला होता. त्यांचे वडील पंडित मोतीराम हे मेवाती घराण्याचे संगीतकार होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांनी पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्वतःच्या वेगळ्या गायकीचा ठसा उमटविणाऱ्या पं. जसराज यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान मोदींचा शोकसंदेश

पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तो फोटो शेअर केला आणि लिहिले की, “पंडित जसराज जी यांच्या निधनाने भारतीय सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. केवळ त्यांचा कलाविष्कारच उत्कृष्ट नव्हते तर इतर अनेक गायकांसाठी त्यांनी असाधारण गुरु म्हणूनही एक ठसा उमटविला. जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना त्यांच्याबद्दल सहवेदना. ओम शांती ”

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनामुळे मला फार दु: ख झाले आहे. मेवाती घराण्याशी संबंधित पंडितजींचे संपूर्ण आयुष्य ध्यानात गेले. आपल्या कलेने त्यांनी संगीताच्या जगाला नवीन शिखरे दिली. त्याच्या जाण्याने संगीत शांत झाले आहे. देव त्यांना त्यांच्या मंदिरात जागा देईल.

नामवंत गायिका मालिनी अवस्थी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, “मेवाती घराण्याचे भूषण गायक पद्मविभूषण पंडित जसराज आता राहिले नाहीत. आज त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. संगीत जगताचे हे न भरुन येणारे नुकसान आहे! विनम्र श्रद्धांजली! ॐ शांती’

यावर्षी जानेवारीत आपला 90 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या पंडित जसराज यांनी नऊ एप्रिल रोजी वाराणसीतील संकटमोचन हनुमान मंदिरासाठी फेसबुक लाइव्हद्वारे हनुमान जयंतीवर शेवटचे सादरीकरण केले होते.

पंडित जसराज (28 जानेवारी 1930 – 17 ऑगस्ट 2020) हे एक महान भारतीय शास्त्रीय गायक होते, ते मेवाती घराण्याशी संबंधित होते.  त्यांच्या संगीत कारकीर्दीस 80 पेक्षा जास्त वर्षे झाली होती. असंख्य मोठे पुरस्कार त्यांना मिळाले होते. भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांच्या संगीत कारकिर्दीचा गौरव केला होता. शास्त्रीय आणि निम-शास्त्रीय गाण्यांबरोबरच संगीत अल्बम आणि चित्रपटांचे साउंडट्रॅकही त्यांनी बनविले होते. जसराज यांनी भारत, कॅनडा आणि अमेरिकेत संगीत शिकवले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे काही विद्यार्थी व्हायोलिन वादक कला रामनाथ यांच्यासारखे उल्लेखनीय संगीतकार बनले आहेत.

Indian classical vocalist Pandit Jasraj. (File Photo: IANS)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.