Pandit Neharu : पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे योगदान प्रत्येकाच्या स्मरणात राहील – राजेश पाटील

एमपीसी न्यूज – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत (Pandit Neharu) जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी दिलेले योगदान प्रत्येकाच्या स्मरणात राहील,  असे प्रतिपादन महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

Solar Power Project : महापालिका इमारतींच्या छतावर सौर उर्जा प्रकल्प, इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमावेळी  सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उपआयुक्त सचिन ढोले,  संदिप खोत,  क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे  यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यानंतर नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Neharu) यांच्या पुतळ्याला आयुक्त पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.