‘पानिपत’ एक विलक्षण चित्रानुभव

(हर्षल आल्पे)

काही ऐतिहासिक चित्रपट असे असतात की जे पहिल्या फ्रेमपासून आपल्या मनाचा ठाव घेतात आणि मग, त्या प्रवाहात आपण मुक्तपणे विहार करायला लागतो. खरतर सिनेमातली ही गोष्ट ही एक शोकांतिका आहे. तसेच तो थरारपट ही आहे अर्थात ‘पानिपत’.

_MPC_DIR_MPU_II

सदाशिवराव भाऊंनी अब्दाली विरुध्द दाखवलेलं चातुर्य, ज्यात तो खर म्हणजे अडकत होता. पराभव समोर दिसत असताना ,आणि मराठा साम्राज्याचा विजय होत असतानाच ऐनवेळी झालेली फितुरी अन त्या चक्रव्युहात अडकलेल्या भाऊंनी दिलेला अयशस्वी लढा निव्वळ अकल्पनीय आणि तरीही चित्रपटात त्याचे अप्रतिम सादरीकरण. खरतर दिग्दर्शक म्हणुन हे एक आव्हानच होते. या आधी नाटकामध्ये रणांगण च्या निमित्ताने हे शिवधनुष्य वामन केन्द्रे यांनी लिलया पेलले होते. त्यानंतर काही वर्षांनी दिग्पाल लांजेकर यांनीही पेलले. मात्र, चित्रनिर्मिती आशुतोष गोवारीकर यांनी ही हे सुंदर रित्या हाताळलय.

अर्जुन कपूरने साकारलेला सदाशिवराव भाऊ आपल्या आश्वासक अभिनयाची जाणीव करुन देतो. अभिनेत्री क्रृती सेनाँन हिने साकारलेली पार्वती बाई समजुन,उमजुन केलेली आहे हे जाणवते. रविंद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे पिता पुत्र पहिल्यांदाच एकत्र एवढ्या मोठ्या सिनेमात दर्शन देतात. हे दर्शन सुखद आहे, चित्रपटात सगळ्यांचीच कामे सुंदर झाली आहेत. गाणी ही विशेष श्रवणीय आणि वातावरणाला साजेशी झाली आहे. विशेष उल्लेख संजय दत्त ने साकारलेला अब्दाली चित्रपटावर एक वेगळीच छाप पाडतो. एकूणच हा चित्रपट एकदा आवर्जुन पाहाण्यासारखा निश्चित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.