BNR-HDR-TOP-Mobile

Panvel : पत्रकार उत्कर्ष समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी रामभाऊ जाधव यांची फेरनिवड

गणेश कांबळे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पत्रकार उत्कर्ष समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी रामभाऊ जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. पत्रकार उत्कर्ष समितीचा वर्धापनदिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान कार्यक्रम नुकताच पनवेल येथे झाला. या कार्यक्रमात रामभाऊ जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. तर गणेश कांबळे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व मागासवर्गीय आयोगाचे सदस्य सी.एल. थुल, माहिती प्रसारण मंत्रालयाचे माजी सचिव विजयकुमार गवई, समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के, सुधीर शर्मा, जगदीश दगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, कामगार नेते संतोष घरत, ज्येष्ठ समाजसेवक गजानन पाटील, रामभाऊ जाधव आदी उपस्थित होते.

रामभाऊ जाधव हे छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. तसेच समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहेत. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम, तसेच त्यांना पेन्शन मिळावी, न्याय हक्कांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आले आहेत. जाधव यांच्या या कार्याची दखल घेत समितीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड केली आहे.

HB_POST_END_FTR-A4

.