PUNE : अमेरिकन डॉलर असल्याचे सांगून रुमालामध्ये दिला पेपरचा बंडल

तब्बल 90 हजारांची केली फसवणूक 

एमपीसी न्यूज – जागेच्या  व्यवहारासाठी  90 हजार एवढी रोख रक्कम घेऊन त्याबदल्यात अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल दिला. ही घटना 18 ऑगस्टला हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी मुक्तार खान (वय 40, रा. खराड) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुक्तार खान यांना विश्वासात घेऊन जागेचा व्यवहार करण्यासाठी चार जणांनी बोलावून घेतले त्यांना 20 अमेरिकन डॉलरच्या एकूण 1210 नोटा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून तब्बल 90 हजार एवढी रोख रक्कम घेतली. त्यानंतर मुक्तार यांना अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल बांधून दिला व तेथून ते चारजण पळून गेले आणि मुक्तार यांची 90 हजार रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.