Alandi News : पापमोचनी एकादशी निमित्त आळंदी मध्ये हजारो भाविकांची गर्दी

आळंदी वाहतूक समस्ये विषयी व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा रंगल्या

एमपीसी न्यूज : आळंदी येथे पापमोचनी एकादशी निमित्त (Alandi News) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलीं मंदिरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरात आकर्षक अशी पुष्प सजावट करण्यात आली होती.

 

भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर लगत आतील परिसरात हिरवे जाळीचे आच्छादन बांधण्यात आले होते. भाविकांसाठी मंदिरामध्ये उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. इंद्रायणी नदी घाटावरती भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. काही दिंड्या प्रदक्षणा रस्त्यावर हरिनामाच्या गजरात माऊलीं च्या जयघोषात नगर प्रदक्षणा पूर्ण करत होत्या.

 

Khed : खेड तालुका जुनी पेन्शन आंदोलन समन्वय कृती समितीचा आंदोलन तीव्र करण्याचा शासनाला इशारा

 

मंदिर परिसरा जवळील नो पार्किंग च्या जागेत अनेक दुचाकी वाहनाने पार्किंग केल्याने भाविकांना त्याचा अडसर होत होता. तसेच लग्न तिथीमुळे लग्नकार्यास आलेल्या नागरिकांनी (Alandi News) रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.याच्या तक्रारीसाठी व उपाय योजनेसाठी आळंदीतील विविध व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा रंगल्या होत्या.

 

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.