Param Vir Chakra : पाकिस्तानचे फायटर जेट पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ प्रदान

एमपीसी न्यूज – हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीर चक्र’ पुरस्काराने आज (सोमवारी) सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाला खाली पाडत पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवन येथे पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी 27 फेब्रवारी रोजी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी रोजी मिग-21 बायसन या विमानातून पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचा पाठलाग करुन, एक विमान पाडलं होतं. त्यानंतर एका मिसाईलनने त्यांच्या विमानाला लक्ष्य केलं. विमान कोसळण्याआधी अभिनंदन बाहेर पडले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तानने त्यांना कैद केलं होतं. परंतु भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अभिनंदन यांना सोडावं लागलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.