Kalewadi: अत्याचार पिडीत मुलीला रुग्णालयातून घेऊन पालक गायब 

एमपीसी न्यूज – लैंगिक अत्याचार झालेल्या तीन वर्षाच्या मुलीला रुग्णालयातून पालकच घेऊन पसार झाल्याचा प्रकार आज (सोमवारी)उघडकीस आला आहे. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. 

काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. त्यामुळे रविवारी मध्यरात्री मुलीचे पालक तिला घेऊन महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात गेले. पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.

परंतु, पहाटे पाचच्या सुमारास पालकाने रुग्णालयातून मुलीला घेऊन पलायन केले. तसेच रुग्णालयात दिलेला राहण्याचा पत्ता देखील चुकीचा आहे. त्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले असून वाकड पोलीस त्या पालकाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.