Pune : ब्रेमेन चौकातील स्पायसर हायस्कूलच्या अवाजवी फी वाढीच्या विरोधात आज पालकांचा ठ्ठिया आंदोलन

एमपीसी न्यूज – स्पायसर हायस्कूलच्या वतीने दरवर्षी अवाजवी फी मध्ये वाढ केली जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने दोन वर्षातून एकदाच 15 टक्के फी वाढीचा मुद्दा असताना स्पायसर हायस्कूलच्या वतीने सरळ 25 टक्क्यांनी फी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी ही फी वाढविली होती तरी देखील यंदा ही वाढविली. याच्या विरोधात स्पायसर हायस्कूलच्या प्रिंसिपल यांच्या कार्यालयाच्या समोरबसून पालकांनी ठ्ठिया आंदोलन केले.

यावेळी पालकांनी मागील वर्षाची जी फी आहे ती तशीच या वर्षी लागू करुन त्याप्रमाणेच वसूल करावी ही मागणी अशी केली. तसेच पुस्तक खरेदी करण्यासाठी स्पायसर हायस्कूलतर्फे फक्त एकच दुकान आहे. स्पायसर हायस्कूलची सर्व 1 ते 10 च्या वर्गाची पुस्तके एकाच ठिकाणी मिळत असल्याने मनमानी पद्धतीने पुस्तके व स्टेशनरीचे दर लावले जात आहे ते कमी करण्यात यावे, चांगले प्रशिक्षित टीचर उपलब्ध करावेत, मुलांची बस सेवा स्कुलच्या आवारातून व्हावी, स्पोर्टस् आणि अन्य अॅक्टिव्हीटीला प्राधान्य द्यावे, आशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत फी न भरण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे. यावर प्रिंसिपल शशिकांत गायकवाड यांनी पालकांना आशवासन दिले आहे की, येत्या शुक्रवारपर्यंत सर्व मागण्यावर सोल्यूशन काढण्यात येईल तोपर्यंत पालकांनी फी व पुस्तके खरेदी करू नये.
यावर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले. पण जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील सोमवारी भव्य स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असे PTA पालकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.