Pune : ‘त्या’ जुळ्या मुलांचे पालक सापडले; प्रेमप्रकरणातून झाला जुळ्यांचा जन्म

एमपीसी न्यूज – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आणि त्यांना पाषाण तलावाजवळ सोडून दिले. हा प्रकार 14 जानेवारी रोजी उघडकीस आला असून याप्रकरणातील आरोपी पालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुण्यात 14 जानेवारी रोजी पाषाण तलावाजवळ सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना तलावाच्या काठावर गोधडीत बांधलेली दोन बाळे आढळून आली. या बाळांच्या रडण्यामुळे नागरिकांचे लक्ष गेले होते. त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी आहेत. दोन जिवंत जुळी बाळे आढळून आली. प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली होती.

_MPC_DIR_MPU_II

सात दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना त्या जुळ्या बाळांच्या पालकांना शोधण्यात यश आले आहे. बाळाची आई आणि वडील दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. ते वडगाव धायरी येथील रहिवासी आहेत. आरोपी आई विधवा आहे. तिला आधीच्या तीन मुली आहेत. दरम्यान, ती जुळ्या बाळांच्या आरोपी वडिलांसोबत मागील काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांच्या प्रेमप्रकरणातून या बाळांचा जन्म झाला होता. चतुःशृंगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रेमाच्या पवित्र आणि कोमल भावनेला आरोपींनी काळिमा फासला आहे. प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीपोटी त्यांनी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोटच्या दोन गोळ्यांना असं निर्जन स्थळावर ठेऊन जाणं हे कृत्य मात्र आई-वडिलांच्या नात्यासह माणुसकीला देखील काळिमा फासणारे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1