Paris: कोरोना विषाणूंच्या बळींचा आकडा 20,599 वर

एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीत डिसेंबरपासून काल (बुधवार) पर्यंत जगभरात एकूण 20 हजार 599 जणांचे बळी गेले आहेत, असे वृत्त ‘एएफपी’ने उपलब्ध अधिकृत आकडेवारीच्या आधारे दिले आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे.

 

जगभरातील विविध देशांकडून मिळालेली अधिकृत आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात संकलित करण्यात येत आहे. ही आकडेवारी धक्कादायक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या आजाराला जागतिक महामारी म्हणून या आधीच जाहीर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like