Warje : रॉकेल टाकून पेटवली  पार्क केलेली वाहने ; साडेबारा हजारांचे नुकसान

एमपीसी न्यूज- रॉकेल टाकून पेटवून अज्ञाताने वाहनांचे नुकसान केल्याची घटना कर्वेनगर येथील कामना वसाहतीत शनिवारी(दि.10) रात्री अडीच च्या दरम्यान घडली.

याप्रकरणी विजय वरघडे(वय 32, रा. कामना वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी विजय वरघडे यांनी त्यांची ऍक्टिव्हा तसेच इतर नागरिकांनी आपल्या मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा लॉक करून पार्क केली होती. रात्री उशिरा कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी व इतर नागरिकांच्या वाहनांवर विनाकारण रॉकेल टाकून ती पेटवून त्यांचे एकूण 12 हजार 500 रुपयांचे नुकसान केले.

याप्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.