Talegaon Crime News : इमारतीच्या खाली पार्क केलेली वाहने अज्ञातांनी पेटवली

एमपीसी न्यूज – इमारतीच्या खाली पार्क केलेली वाहने अज्ञातांनी रात्रीच्या वेळी पेटवून दिली. ही घटना सोमवारी (दि. 29) मध्यरात्री दीड ते तीन वाजताच्या सुमारास म्हाळसकरवाडी, तळेगाव स्टेशन येथे घडली.

संतोष नागप्पा बिनसाळ (वय 39, रा. म्हाळसकरवाडी, तळेगाव स्टेशन) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या जागेत त्यांनी त्यांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री दीड ते तीन वाजताच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या. त्यात गाड्यांचे सुमारे तीन लाख 67 हजारांचे नुकसान झाले. यामध्ये एक कार, दोन दुचाकी आणि एक सायकल जळाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.