Parner : पाण्याच्या शोधात घरात शिरलेला बिबट्या जेरबंद, परत सोडले जंगलात !

एमपीसी न्यूज- पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या अचानकपणे एका घरात शिरला. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर त्याला जेरबंद करून पुन्हा जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे घडली.

पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या काळेवाडी येथील एका घरात शिरला आणि अडकला. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जाळे टाकून जेरबंद केले. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या बिबट्याने प्रथम भरपूर पाणी प्यायले. त्यानंतर सुमारे एक किलो चिकन फस्त केले.

त्यानंतर या बिबट्याला पुन्हा निसर्गात सोडण्यात आले. दरम्यान, या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याची तब्येत उत्तम असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या मोहिमेत अनिल खैरे, डॉ सुचित्रा सूर्यवंशी, डॉ ऐश्वर्या बेतगिरी तसेच पुणे आणि अहमदनगर विभागाचे वन कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.