Parthiv Patel Retires : पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

एमपीसी न्यूज – भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थिव पटेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पार्थिव पटेलनं भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं होतं. वयाच्या 35व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

पार्थिव पटेलनं 2018 मध्ये टीम भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

पार्थिव पटेलनं ट्विटरवर ट्वीट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. पार्थिव पटेलंनं लिहिलं की, ‘मी आज माझ्या 18 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा करत आहे.

‘बीसीसीआय’ने माझ्यावर विश्वास दाखवत वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मला दिली. बीसीसीआयने ज्याप्रकारे माझी साथ दिली, त्यासाठी नेहमीच आभारी राहिल.

ज्या कर्णधारांच्या नेतृत्त्वात तो टीम इंडियासाठी खेळला होता, त्या सर्व टीम इंडियाच्या कर्णधारांचे पार्थिव पटेलनं आभार मानले आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे त्याने खासकरुन आभार मानले असून पार्थिव म्हणाला की, ‘दादांचा मी नेहमीच आभारी असीन.

एक कर्णधार म्हणून गांगुली नेहमीचं माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्यासोबत टीम इंडियासाठी खेळणं हे माझं सौभाग्य होतं’, अस त्यांनी लिहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.