Bhosari News : खर्डेवस्ती येथे आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खर्डेवस्ती येथे एका तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) सायंकाळी उघडकीस आला आहे.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डेवस्ती येथील मोकळ्या मैदानात निर्जन ठिकाणी एका तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तरुणाचा चेहरा पूर्णपणे जळाला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.