Smart City Mission : नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’ उपक्रमात सहभागी व्हा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशनचा (Smart City Mission) 7 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. 25 जून 2022 रोजी स्मार्ट सिटी मिशनला 7 वर्षे पूर्ण होत असून या कालावधीत शहर अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि अधिक गतिमान बनविण्यात आपण किती पुढे आलो आहोत, हे प्रसंग साजरे करण्यासाठी व हरित शहर, नव्याने विकसीत झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारच्या “सबका भारत, निखरता भारत” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने 25 ते 27 जून 2022 या कालावधीत राबविण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संघटना यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनची (Smart City Mission) 25 जून 2022 रोजी 7 वर्षे साजरी करण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी कार्यक्रम आयोजनाबाबत आयुक्त यांच्या दालनात शुक्रवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे उपमुख्य अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, सुनिल पवार आदी उपस्थित होते.

SSC Result 2022 : खेड तालुक्याचा शेकडा निकाल 96.33 टक्के; 51 शाळांचा 100 टक्के निकाल

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत उभारण्यात आलेले आयसीसीसी (ICCC) ला विद्यार्थ्यांच्या भेटींचे आयोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प पाहणी दौरा, तज्ञ आणि मीडियासाठी क्युरेटेड ट्रिपची योजना, मिशन प्रवासाचे चित्रांकन, हवामान जागरूकता मोहीम, लोकांची मते, सार्वजनिक जागा सुधारणे, तरुण उद्योजकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित ‘आयडियाथॉन’ आणि नागरी उपायांची अंमलबजावणी, शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, रेडिओ शो, कौशल्य विकास केंद्र स्टार्टअपमध्ये नवोपक्रम मेळावे, हरित शहर, नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांजवळ देशी वृक्ष लावण्यासाठी जागृत करणे, शहरी शेतीवरील कार्यशाळा, थंड आणि ऊर्जा कार्यक्षम इमारत बांधकाम पद्धती ( उभ्या उद्यान, ऊर्जा कार्यक्षमता साध्य करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, पारंपारिक बांधकाम साहित्य आणि वास्तुकलांचा वापर), स्मार्ट सिटी फेअर – कौशल्य विकास केंद्रातील उत्पादनांचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शने, व्हिडिओ, 3-डी डिजिटल मॉडेल्स, जलद, कमी किमतीत प्लेसमेकिंग/स्थानिक परिवर्तन आदी विषयांवर चर्चा करून कार्यक्रम आयोजनाबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आले.

Raj Thackeray यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया, चाचण्यांसाठी आज रुग्णालयात दाखल होणार : सूत्र

इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने इंटरकॉलेजिएट बिझनेस प्रोजेक्ट अशा UDAAN स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील आयसीसीसी, एबीडी एरिया, 8 टू 80 पार्क, सीसीटीव्ही, ई- क्लासरुम, फुटपाथ, स्टार्टअप अशा नव तंत्रज्ञान व कौशल्यपूर्ण प्रकल्पांची नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. तसेच, ड्रेनेज सोल्यूशन, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट सोल्युशन, पर्यावरण, शहर स्वच्छता आदींवर सोल्युशन मांडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी सांगीतले. तत्पूर्वी, पीसीएमसी स्मार्ट सारथी प्रतिनीधींनी उपक्रमाचे सादरीकरण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.