Chakan : भारत बंदमध्ये सहभागी व्हा…

खेड तालुका काँग्रेसचे आवाहन 

एमपीसी न्यूज – पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.10) सर्व विरोधी पक्षांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. खेड तालुक्यातील व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन खेड तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष विजय डोळस, जिल्हा प्रवक्ते निलेश कड-पाटील यांनी केले आहे. निलेश कड-पाटील यांनी सांगितले की, खेड तहसील कार्यालावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, चाकण पोलिसांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शांततेत बंद  करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.