Talegaon Dabhade News : राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात 40 लाभार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर शनिवारी (दि. 14) पार पडले. या शिबिरात 40 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबीर झाले.

प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी आयोजित राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन रोटरीचे संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे यांच्या शुभहस्ते रो किरण ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.प्रमुख पाहुणे रो तानाजी मराठे रो संजय मेहता हे उपस्थित होते.

दुर्बिणीद्वारे सर्जन डॉ गजरे यांनी शस्त्रक्रिया केल्या. शिबिराचे नियोजन डॉ उन्मेश गुट्टे, डॉ राजेंद्र मोहिते,डॉ दिनेश महालिंगे,प्रशांत आगलावे व सर्व आशा वर्कर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.