Pashan crime News :पोलिसांना धक्काबुक्की करणारे आंदेकर टोळीतील पाच जण अटकेत

एमपीसीन्यूज : पाषाण परिसरात पोलिसांनी गाडी अडविल्याच्या रागातून पोलिसांसोबत वाद घालत त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणाऱ्या आंदेकर टोळीतील पाच जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

राहूल सुरेश खेत्रे (वय 40, रा. नाना पेठ), समीर विनोद तांबे (वय 31, रा. नरपतगिरी चौक), शार्दुल प्रमोद ढाके (वय 28, रा. बावधन) शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय 25, रा. नाना पेठ), साईराज सुनिल काकडे (वय 23, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री चतु:शृंगी पोलिसांचे काही कर्मचारी पाषाण परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना संशयास्पदरीत्या फिरणारी एक कार दिसली.

पोलिसांनी ही कार अडवली असता कारमध्ये असणाऱ्या तरुणांनी मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता आरोपींनी कार अडविल्याच्या रागातून पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like