Chakan : बस सुरु करण्याच्या प्रयत्नात प्रवाशांना फुटला घाम

एमपीसी न्यूज – चाकण एसटी बस स्थानकात आल्यानंतर अचानक एका बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला व ती बंद पडली. बराच वेळ प्रयत्न करूनही बस सुरु न झाल्याने चालक, वाहकांनी प्रवाशांच्या मदतीने बसला धक्का देऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळपर्यंत ती बस सुरू तर झालीच नाही उलट प्रवाशांसह एसटी कर्मचार्‍यांचा चांगलाच घाम निघाल्याचे चित्र शुक्रवारी (दि.२९) येथे पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like