Lonavala News : ओढ्यावरील अतिक्रमणामुळे घरांमध्ये शिरले पाणी, ‘ओशो’मधील 20 पर्यटकांची सुखरूप सुटका

एमपीसीन्यूज : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण गावातील जुन्या राजाणा ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणाचा फटका परिसरातील ग्रामस्थांना बसला आहे. अतिक्रमणामुळे ओढ्याच्या प्रवाह उलटून लगतच्या घरांमध्ये पाणी शिरल. तकाही ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, मळवली जवळ भाजे हद्दीतील ओशो आश्रमात अडकलेल्या 20 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात शिवदुर्ग आणि वनरक्षक विभागाच्या पथकाला यश आहे.

मावळ परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मावळात अनेक ठिकाणी नद्या नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पाटण हद्दीत जुन्या राजाणा ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणाचा फटका परिसरातील ग्रामस्थांना बसला आहे.

अतिक्रमणामुळे ओढ्याच्या प्रवाह उलटून लगतच्या घरांमध्ये पाणी शिरल. तकाही ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला. येथील घरकुल सोसायटीत पाणी शिरले. तसेच पाटण गावातील तीन ते चार घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. तसेच परिसरातील अनेक रस्ते आणि शेतीचे मोठे नुकसान झाले.

इंद्रायणी नदीला पूर आल्याने मळवली जवळील भाजे गावाच्या हद्दीत ओशो आश्रमात 20 पर्यटक अडकून पडले होते. याबाबत माहिती मिळताच शिवदुर्ग आणि वनरक्षक विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलविले.

दरम्यान, मंडलाधिकारी माणिक साबळे व तलाठी मीरा बोराडे यांनी तात्काळ पाटण हद्दीत जाऊन ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते तिथे पाणी केली. त्यानंतर आज सकाळी पंचनामे सुरु केले. युवा सेना उपतालुकाधिकारी विजय तिकोने, शिवसेनेचे संतोष येवले, ग्रामस्थ गबळू दाभाडे आदी उपस्थित होते.

पाटण गावाच्या हद्दीत बोरज रोड परिसरात मुसळधार पाळसामुळे ओढ्याला पूर येऊन त्याचे पाणी ग्रामस्थांच्या घरात तसेच बंगल्यांमध्ये शिरले. जुन्या राजाणा ओढ्यावर झालेली अतिक्रमणे आणि प्लॉटिंग यामुळे येथे पूर आला. परिणामी घरांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांची गैरसोय झाली. शिवाय रस्त्यांची दुरवस्था झाली. शेतीचेही नुकसान झाले. ही अतिक्रमणे तात्काळ काढून टाकण्यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. विजय तिकोने : युवा सेना उपतालुका अधिकारी मावळ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.