Patanjali Clarification: ‘कोरोनिल’साठी परवाना घेताना आम्ही काहीही चुकीचे केले नाही – आचार्य बालकृष्ण

Patanjali Clarification: We did nothing wrong while getting license for 'Coronil' - Acharya Balakrishna आम्ही औषधाची (कोरोनिल) जाहिरात केली नाही, आम्ही लोकांना औषधाच्या परिणामकारकेबाबत  सांगण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्टीकरण 'पतंजली आयुर्वेद'ने केले आहे.

एमपीसी न्यूज – ‘पतंजली आयुर्वेद’ने कोरोनिल या औषधनिर्मिती व विक्रीचा परवाना घेताना काहीही चुकीचे केले नाही, असा दावा पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. आम्ही औषधाची (कोरोनिल) जाहिरात केली नाही, आम्ही लोकांना औषधाच्या परिणामकारकेबाबत  सांगण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्टीकरण त्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.

पंतजली आयुर्वेदने नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यात कोरोनावरील औषधांचे लँचिंग केले होते. त्यानंतर काही तासांतच केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने त्यावर हरकत घेतली व कायदेशीर बाबींची पूर्तता होईपर्यंत या औषधांची जाहिरात करण्यावर बंदी घातली. त्या पाठोपाठ उत्तराखंड सरकारने देखील कोरोनाचा उल्लेख न करता पतंजलीने हा परवाना घेतल्याचा आरोप करीत पतंजलीला नोटीस बजावली. महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. या पार्श्वभूमीवर पतंजलीचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

‘पतंजली आयुर्वेद’ने औषध (कोरोनिल) तयार करण्यासाठी सर्व प्रक्रियेचे अनुसरण केले आहे. आम्ही औषधात वापरल्या जाणार्‍या संयुगांच्या शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे परवान्यासाठी अर्ज केला. आम्ही संयुगावर काम केले आणि क्लिनिकल चाचणीचा निकाल लोकांसमोर ठेवला, असे  आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.