Corona Vaccine : ‘कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल, ‌85 लाख किट विकून कमावले 241 कोटी 

एमपीसी न्यूज – योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’नं फक्त चार महिन्यांत 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. चार महिन्यांच्या कालावधीत कंपनीने कोरोनिल विक्रितून 241 कोटी कमवले आहेत. न्यूज 18 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. 

न्यूज 18 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने 23 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान एकूण 23 लाख 54 हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. या औषधाची किंमत 545 रुपये ठेवण्यात आली आहे. बरेच कोरोना रुग्ण तसेच इतर लोक  खबरदारीचा उपाय म्हणून या औषधाची खरेदी करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

 https://fb.watch/1vrol9qvvN/

कोरोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार कंपनीकडून करण्यात आला होता. रामदेव बाबा आणि ‘पतांजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी 23 जूनला या औषधाची घोषणा केली. हे औषध कोरोनावर खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता. मात्र, ‘पतंजली आयुर्वेद’ने कोरोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केल्यानंतर आयुष मंत्रालयाने तातडीने  ‘पतंजली’ला या औषधाची जाहिरात करण्यास मनाई केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.