Chinchwad News : धैर्य आणि शिस्त हे यशासाठी दोन सर्वात महत्त्वाचे गुण – नीरज चोप्रा

एमपीसी न्यूज – धैर्य आणि शिस्त हे यशासाठी दोन सर्वात महत्त्वाचे गुण आहेत, असे उद्गार ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांनी काढले. निरज चोप्रा यांनी चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला रविवारी (दि.10) भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी संचालीक – प्राचार्या डॉ. अमृता वोहरा यांनी युवा चॅम्पियनचा निरज यांचा सत्कार केला आणि त्यांचे शाळेमध्ये स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. प्रत्येकाला त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे कौतुक होते. मंचावरच्या त्यांच्या उपस्थितीने शाळेचे सभागृह खऱ्या अर्थाने जीवंत झाले होते.

नीरच चोप्रा म्हणाले, ‘धैर्य आणि शिस्त हे यशासाठी दोन सर्वात महत्त्वाचे गुण आहेत. एखाद्याने नेहमी त्यांच्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे आणि त्याचे पालन करणे महत्वाचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या खेळाची निवड करण्याची परवानगी दिली पाहिजे, असे चोप्रा म्हणाले.

यावेळी नीरज चोप्रा यांनी सर्वांच्या आग्रहास्तव भालाफेकचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर त्यांनी भाल्यावर सही करून तो भाला एल्प्रोचे क्रिडा कर्णधार सुष्टीसिंह यांना भेट दिला. सुर्ष्टीसिंह हे स्वतः राष्ट्रीय स्तराचे भालाफेक चॅम्पियन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.