India Corona Update : रुग्ण घट कायम ! गेल्या 24 तासांत 80 हजार नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – भारतात मागील पाच ते सहा दिवसांपासून एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशात नव्यांन वाढ होणा-या कोरोना रुग्ण संख्येत घट कायम असून, गेल्या 24 तासांत देशभरात 80 हजार 834 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 70 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 94 लाख 39 हजार 989 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 80 लाख 43 हजार 446 रुग्ण उपचारा नंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 32 हजार 062 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. सध्याच्या घडीला देशात 10 लाख 26 हजार 159 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 70 हजार 384 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 303 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.25 टक्के एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

देशात आजवर 37 कोटी 81 लाख 32 हजार 474 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 312 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 25 कोटी 31 लाख 95 हजार 048 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.