India Corona Update : रुग्ण घट कायम ! ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पंधरा लाखांच्या खाली 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी नीच्चांकी रुग्णवाढ नोंदवली आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पंधरा लाखांच्या खाली आली आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 88 लाख 09 हजार 339 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 89 हजार 232 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 93.66 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत असून ती पंधरा लाखांच्या खाली आली आहे. देशात सध्याच्या घडीला 14 लाख 77 हजार 799 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 46 हजार 759 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 2 हजार 677 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे‌. दररोज 20 लाखांहून अधिक नमूने तपासले जात आहेत. देशात आजवर 36 कोटी 47 लाख 46 हजार 522 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 20 लाख 36 हजार 311 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.