Sangvi  : विजयादशमीनिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीत पाटीपूजन व सरस्वतीपूजन

एमपीसी  न्यूज –  जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विजयादशमी दसर्‍यानिमित्त पाटीपूजन आणि सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

विद्येची देवता सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पाटीवर फुले वाहून सरस्वती देवीचे शस्त्र म्हणून पाटीचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी नाटकातून रावणाविषयी माहिती सादर केली. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे-पाटील, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, आशा घोरपडे, स्वाती तोडकर, दिप्ती दुबे, मुक्ता उपाध्ये, भटू शिंदे आदींसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

हर्षा बाठिया यांनी ‘रावण’ या व्यक्तिमत्वाच्या सकारात्मक बाबी विद्यार्थ्यांना सांगितल्या. तसेच राग, द्वेष, अहंकार हे वाईट गुण सर्वांनी सोडून द्यावेत, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. मुक्ता उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना रावणातील विविध कौशल्यांची माहिती दिली. स्वाती तोडकर यांनी विद्यार्थ्यांना विजयादशमी का साजरी केली जाते ? पाटीपूजनाचे महत्त्व आणि सरस्वती चिन्हात असलेल्या त्रिकोणाचे महत्त्व सांगितले. तसेच ‘या देवी सर्व भूतेशू’ हे गीत सादर केले.

आरती राव म्हणाल्या, कोणतीही विद्या परिश्रमानेच साध्य होते. परिश्रम केल्यास सरस्वतीचा वरदहस्त लाभतो. तोच वरदहस्त अशा कार्यक्रमांतून मिळवून आपल्या परंपरेचे जतनही करता येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.