Nigdi: प्रजासत्ताकदिनी निगडीत राष्ट्रध्वजासमोर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिकेने भक्ती-शक्ती चौकात सकाळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्यावतीने देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आला आहे. मुंबईहून निगडी येथे उद्योगनगरीत प्रवेश करतानाच 90 बाय 60 आकाराचा हा राष्ट्रध्वज नजरेस पडतो. पावसाळा ऋतु व्यतिरिक्त आठ महिने हा राष्ट्रध्वज फडकविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिकेने भक्ती-शक्ती चौकात सकाळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमासाठी कलाकार मानधन, फ्लेक्सद्वारे प्रसिद्धी, फुगे आदींसाठी अंदाजे दीड लाख रूपये इतका खर्च होणार आहे. या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1