Bhosari : भोसरीत देशभक्‍तीपर काव्य मैफल

एमपीसी न्यूज – भोसरी येथील “नक्षत्राचं देणं काव्यमंच’ या संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर काव्य मैफलीचे आयोजन केले होते.

यावेळी, कवी कौतिक पाटील यांच्या “पांडुरंगी अक्षरे’ काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र खेर यांच्या हस्ते करण्यात आले. राजेंद्र सोनवणे, बाबासाहेब पाटील, एस. ओ. पाटील, संतोष खंगरे, रुपा पाटील, गोपाळ पाटील, आप्पा घुले, नरेंद्र पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक सामाजिक संदेश देण्यासाठी वृक्षाचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर, गायक मनमोहन जालेपोलेलू यांनी देशभक्तीपर गाणे गाऊन कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी अंजू सोनवणे, विनायक विधाटे, शांताराम हिवराळे, दिलीप गोरे, दिगंबर झाडे, रामदास हिंगे, ओंकार आगाशे, राजेंद्र कुवर आदी कवींनी बहारदार काव्यरचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.