PAVANA BANK : बिनविरोध नाहीच! सभासदांना निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे लागणार

एमपीसी न्यूज –  पवना सहकारी बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध (PAVANA BANK) करण्याची माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी वारंवार विनंती करुनही काही जणांनी प्रतिसाद दिला नसल्याने बँकेच्या सभासदांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सर्वसाधरण गटातील 14 पुरुष, सर्वधारण गटातील दोन महिला आणि अनुसूचित जाती-जमातील गटातील एक अशा 17 जागांसाठी 9 एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया होईल. दरम्यान,  अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे वसंत लोंढे, संभाजी दौंडकर बिनविरोध निवडून आले आहेत.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील पवना सहकारी बँक ही सर्वात जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते कै. अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या बँकेवर माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांचे किंवा त्यांना मानणाऱ्या विचारांचे संचालक मंडळ सर्व काळ सत्ता पदावर राहिलेले आहे. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे हे सर्वांना बरोबर घेऊन जातात.  सर्व पक्षीयांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत.

 

 

Pune : पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री

 

 

पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची 2022-23 ते 2027-28 या काळासाठीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी 9 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर करण्यात आले आहे. जुने-नवे असा समतोल साधून संचालकपदासाठी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन लांडगे यांनी केले. वारंवार विनंती करुनही विरोधकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काही जणांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली. त्यामुळे नाईलाजास्तव सभासद, भागदारकांना निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. सर्वसाधरण गटातील 14 पुरुष, सर्वधारण गटातील दोन महिला आणि अनुसूचित जाती-जमातील गटातील एक अशा 17 जागांसाठी निवडणूक होईल. ज्यांना  पहिल्या पसंतीची मते मिळतील ते निवडून येतील.

 

 

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे दोघे बिनविरोध

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधून सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्‍वर लांडगे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शिवाजी वाघेरे, शामराव फुगे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, चेतन गावडे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, बिपीन नाणेकर, सचिन काळभोर तर अनुसूचित जाती गटातून दादू डोळस, महिला राखीव गटातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर उमेदवार आहे. तर, इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त (PAVANA BANK) जाती गटातून संभाजी दौडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.