Pavana Dam: धरणातून 2121 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणारे (Pavana Dam) पवना धरण 97.98 टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विद्युतर्निमिती (हायड्रोद्वारे) 1400 क्युसेक तर धरणाच्या धरणाच्या सांडव्याद्वारे 2 हजार 121 क्युसेकद्वारे असे 3 हजार 521 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.

मागील रविवारपासून पवना धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्यामुळे पाच दिवसात धरणातील पाणीसाठ्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील एकूण पाणीसाठा 97.18 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे  पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1 हजार 980 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरही पावसाचा जोर कायम होता. दिवसभरात 5 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली होती.  रात्रीही पाऊस सुरुच होता. त्यामुळे सकाळपर्यंत तीन टक्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली.

पावसाचा जोर बघता रात्रीपासून (Pavana Dam) धरणातून विसर्ग सुरु केला आहे. रात्री विद्युत र्निमिती गृहाद्वारे 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. रात्रीपासून सांडव्याद्वारेही विसर्ग सुरु केला. विद्युतर्निमिती (हायड्रोद्वारे) 1400 क्युसेक तर धरणाच्या धरणाच्या सांडव्याद्वारे 2 हजार 121 क्युसेकद्वारे असे 3 हजार 521 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी वाहू लागली आहे.

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागरण फेरी

धरणाच्या खालील बाजूकडील नदी तिरावरील गावांमधील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी. नदी पात्रात व लगत असलेली सर्व साधन सामुग्री व जनावरे सुरक्षित ठीकाणी हलविण्यात यावीत. जेणेकरून कुठल्याही प्रकारची वित्त व जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.