Maval : दमदार पावसामुळे पवना धरण 39.40 टक्के भरले !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 39.40 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 58 मिमी पाऊस झाला असून 2. 75 टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. 

‌ 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1017 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 25. 94 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी आजमितीला धरणात 46.17 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

‌पावसाळा असूनही शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा. शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like