Pavana Dam News: पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण 94.44 टक्के भरले

एमपीसी न्यूज – पवना धरण क्षेत्रात शुक्रवारी (दि. 28) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 1.89 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण 94.44 टक्के भरले आहे.

31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगला जोर धरला आणि धरणातील पाणीसाठा वाढू लागला. आता धरणाची 100 टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

1 जूनपासून आजपर्यंत 1 हजार 461 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच काळात पवना धरणातील पाणीसाठा 59.15 टक्के वाढला आहे.

गेल्या 24 तासात 36 मिलिमीटर पाऊस पडला आहे. डोंगराळ भागातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे. त्यामुळे मागील 24 तासात पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागील वर्षी आजच्या तारखे पर्यंत 3 हजार 154 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर धरणातील पाणीसाठा 100 टक्के होता.
आज धरणात 94.44 टक्के पाणीसाठा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1