Pavana Dam: पवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कमी करून 3500 क्यूसेक

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवाना धरणातील पाणीसाठी वाढला असून पवना धरण 98.86 टक्के भरले आहे.(Pavana Dam) आज दुपारी 2 वा. पवना धरणातुन साेडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून 3500 क्यूसेक करण्यात आला आहे.

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग 5500 क्यूसेक्स करण्यात येत होता.. तो आज दुपारी 2 वा कमी करून 3500 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच पाणलाेट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातुन साेडण्यात येणारा विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. असंही सांगण्यात आले आहे.

NCP : पर्यावरण सेलच्या वतीने 75 वृक्षांची लागवड

पवना धरण परिसरात गेल्या काही दिवसापासून चांगला पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून येणारे धबधबे व निचरा यामुळे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे.(Pavana Dam) यामुळे पवना नदीची पाणी पातळी वाढली असून नदीपात्राच्या जवळ नागरिकांनी जाऊ नये; असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पवना धरणाची पाणी क्षमता 8.51 टीएमसी आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी,चिंचवड शहराला या धरणामधून पिण्यासाठी पाणी वापरले जाते. धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.