Pimpri News : थेरगाव सोशल फाउंडेशन मार्फत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषित पाणी व मृत मासे भेट

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून त्या प्रदूषित पाण्यामुळे नदीमधील जलचर प्राणी व मासे इत्यादी मृत्युमुखी पडत असून महानगरपालिका प्रशासन या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या गांभीर्याने उपाययोजना (Pimpri News) करत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत.  याप्रकरणी कसुन चौकशी करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करुन कठोर कारवाई करण्यात यावी व परत अशा प्रकारची घटना घडू नये, याची दक्षता महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात यावी.

मागील अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या घटना घडल्या असून वेळोवेळी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागास तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्र व्यवहार, निवेदने व आंदोलने करून कारवाई करण्याची सूचना थेरगाव सोशल फाउंडेशन च्या मार्फत करण्यात आली होती. तरी देखील महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग या घटनांना आवर घालू शकले नसून हे महानगरपालिका पर्यावरण विभागाचे सर्वात मोठे अपयश आहे.

PCMC News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो पदोन्नती संदर्भात शासनाकडे तक्रारी करु नका, अन्यथा…

त्यामुळे आज फाउंडेशनच्या वतीने मर्यत मासे व दूषित पाणी पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांना देण्यात आले. (Pimpri News) पुढील काळात यावर पालिकेने कायमस्वरुपी तोडगा काढला नाहीतर शहरातील सर्व पर्यावरणवादी संघटनांच्या मोठया रोषास सामोरे जावे लागेल व त्यास सर्वस्वी पिंपरी-चिंचवड महनगरपालिका जवाबदार असेल असा ईशारा पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांना देण्यात आला आहे.

यावेळी फाउंडेशनचे अनिकेत प्रभू, राहुल सरोदे, गणेश डांगे, अमोल शिंदे, प्रकाश गायकवाड इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल सरोदे म्हणाले की मृत मासे काही लोक गोळा करून विकायला नेत आहेत. अशा माशांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.