Pavana Sahakari Bank: अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या पाठिशी सर्वच राजकीय पक्ष, सभासदांचा मिळाला मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेच्या संचालक (Pavana Sahakari Bank) मंडळाच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीतील प्रचारात अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला सभासद, भागधारक, खातेधारकांसह सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुखही पॅनेलच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. पॅनेलमधील सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.

पवना सहकारी बँक ही शहरातील सर्वांत जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी सर्वांना बरोबर घेऊन बँकेची यशस्वीपणे वाटचाल सुरु ठेवली. सर्वांना सोबत घेवून बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला. कामगारनगरी पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य, कष्टकरी नागरिकांची ‘अर्थवाहिनी’ अशी पवना सहकारी बँकेची ओळख निर्माण केली.

नवीन 5 शाखा सुरु होणार

ग्राहकांच्या सोयीसाठी विविध 27 कर्ज योजना राबविण्यात आल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. ठेवींवर जास्तीत-जास्त व्याजदर देणे, ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींना अधिकचा व्याजदर दिला जातो. बँकेच्या सद्यस्थितीत 22 शाखा कार्यरत आहेत. आणखी नवीन 5 शाखा सुरु करण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केलेली असून ती लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Pavana Sahakari Bank : पवना बँक लोकांची बँक, पारदर्शक कारभारामुळे बँकेची प्रगती – ज्ञानेश्वर लांडगे

काही जणांच्या भूमिकेमुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सभासदांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने सर्व परिसर पिंजून काढला. प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विभागनिहाय सभा झाल्या. सभांना भागदारक, खातेधारकांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील सर्वंच राजकीय पक्षाचे प्रमुख देखील पॅनेलच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. उद्या रविवारी अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या कपबशी या चिन्हावरील शिक्का मारुन सर्वांना मोठ्या मताधिक्याने (Pavana Sahakari Bank) विजयी करण्याचे आवाहन पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील उमेदवार

सर्वसाधारण गट-
(17)लांडगे ज्ञानेश्वर पांडुरंग
(03)काळभोर विठ्ठल सोमजी
(06)गराडे शांताराम दगडू
(01)काटे जयनाथ नारायण
(14)फुगे शामराव हिरामण
(18)वाघेरे शिवानी हरिभाऊ
(04)काळभोर शरद दिगंबर
(16)लांडगे जितेंद्र मुरलीधर
(08)गावडे अमित राजेंद्र
(10)चिंचवडे सचिन बाजीराव
(05)काळभोर सचिन ज्ञानेश्वर
(09)गावडे चेतन बाळासाहेब
(07)गव्हाणे सुनील शंकर
(13)नाणेकर विपीन निवृत्ती
महिला राखीव गट-
(03)गावडे जयश्री वसंत
(02)काळभोर ऊर्मिला तुळशीराम
अनुसूचित जाती / जमाती गट-
(02)डोळस दादू लक्ष्मण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.