Pavana Sahakari Bank : अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेच्या संचालक (Pavana Sahakari Bank) मंडळाच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने आकुर्डीत नारळ फोडला. विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. सभासदांनी इतके वर्ष योग्य लोकांच्या हाती बँकेचे नेतृत्व दिले. यावेळीही योग्य लोकांच्या हातीच बँकेचे नेतृत्व सभासद देतील असा विश्वास पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.

 

आकुर्डीतील कै. मल्हारराव कुटे सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या या सभेला प्रचार प्रमुख संजोग वाघेरे, नितीन लांडगे, माजी नगरसेवक अमित गावडे, तुकाराम काळभोर, माजी नगरसेवक शंकर पांढरकर, आप्पा बागल, निलेश पांढरकर, वैशाली काळभोर, धनंजय काळभोर, भाजपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, माऊली जेष्ठ नागरिक संघ व शिवशक्ती जेष्ठ नागरिक संघाचे प्रमुख, आकुर्डी, निगडीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri News : मिलिटरी डेअरी फार्म पुलाच्या कामाचे आदेश

पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, गेल्या 50 वर्षांपासून पवना सहकारी बँकेचे नेतृत्व सभासदांनी योग्य लोकांच्या हाती दिले. त्याचप्रमाणे यावेळीही योग्य लोकांच्या हाती बँकेचे नेतृत्व द्याल याची खात्री आहे. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील उमेदवारांचे कपबशी चिन्ह आहे. उमेदवारांना मतदान करुन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

प्रचार प्रमुख संजोग वाघेरे पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील पवना सहकारी बँक (Pavana Sahakari Bank) ही सर्वात जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी बँकेला पुढे नेले.सर्वांना सोबत घेवून बँकेचे कामकाज केले. निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. पण, काही लोकांच्या भुमिकेमूळे निवडणूक लागली आहे. सर्व सभासदारांनी अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील सर्व उमेदवारांना विजयी करावे.

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील उमेदवार

सर्वसाधारण गट-
(17)लांडगे ज्ञानेश्वर पांडुरंग
(03)काळभोर विठ्ठल सोमजी
(06)गराडे शांताराम दगडू
(01)काटे जयनाथ नारायण
(14)फुगे शामराव हिरामण
(18)वाघेरे शिवानी हरिभाऊ
(04)काळभोर शरद दिगंबर
8. (16)लांडगे जितेंद्र मुरलीधर
(08)गावडे अमित राजेंद्र
(10)चिंचवडे सचिन बाजीराव
(05)काळभोर सचिन ज्ञानेश्वर
(09)गावडे चेतन बाळासाहेब
(07)गव्हाणे सुनील शंकर
(13)नाणेकर विपीन निवृत्ती
महिला राखीव गट-
(03)गावडे जयश्री वसंत
(02)काळभोर ऊर्मिला तुळशीराम
अनुसूचित जाती / जमाती गट-
(02)डोळस दादू लक्ष्मण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.