Sangvi: पावनाथडी जत्रेचे ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते उद्घाटन

पवनाथडी जत्रेचे उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने महिला बचत गटांसाठी एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे हे पाहून आनंद झाला. गरिबीमुळे मला शिकता आले नाही, परंतु निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकले. बचत गटांच्या माध्यमातून पिकांच्या जातींबद्दल मला माहिती मिळाली. आज बाजारामध्ये उपलब्ध होत असलेल्या भाज्यांमध्ये चमक असली तरी धमक बिल्कुल नाही. आज उपलब्ध असलेल्या भाज्या आरोग्यास हानिकारक आहेत. जुनं ते सोनं असतं म्हणूनच बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी जुन्या परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे असे मत देशभर ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.

तसेच प्रत्येक गावी पैशांच्या अनेक बँका आहेत. परंतु देशी बियांच्या बँका सुरु होणेही गरजेचे आहे. काळ्या मातीशी नातं जोडलं म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले असेही त्या म्हणाल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने नवी सांगवी येथे आयोजित पवनाथडी जत्रेचे उदघाटन राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झाले. रविवारपर्यंत ही जत्रा चालणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.  त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर यांची विशेष उपस्थित होती. उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,  महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, शिक्षण समिती सभापती मनीषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अश्विनी जगताप, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नगरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सुजाता पालांडे, शारदा सोनावणे, सुमन पवळे, सुनिता तापकीर, नीता पाडाळे, सविता खुळे, अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे, सीमा चौघुले, विनया तापकीर, अनुराधा गोरखे, आशा धायगुडे-शेडगे, जयश्री गावडे, अश्विनी जाधव, साधना मळेकर, नगरसदस्य हर्षल ढोरे, विलास मडिगेरी, संतोष कांबळे, चंद्रकांत नखाते, संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, मोरेश्वर शेडगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, नगरसचिव तथा सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आशा दुरगुडे, आयुक्त अण्णा बोदडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहताना कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, ही भावना निर्माण व्हावी म्हणून महापालिका विविध योजना राबवीत असते. महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 40 कोटी रुपये खर्च करते. पाच दिवस चालणा-या या जत्रेमध्ये पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन महिला बचत गटांना आपला पाठींबा द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर म्हणाली की, पवनाथडी जत्रेचे हे सलग बारावे वर्ष आहे यातूनच या जत्रेच्या लोकप्रियतेची प्रचीती येते. अशाच प्रकारे महिलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका शुभांगी शिंदे यांनी केले तर आभार माजी स्थायी समिती सभापती  विलास मडीगेरी यांनी मानले. यानंतर भवानी प्रोडक्शनचे अरुण गायकवाड यांनी जल्लोष महाराष्ट्राचा हा मराठमोळी संस्कृती सांगणारा कार्यक्रम सादर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.