Pimpri News : ‘पवनाकट्टा’ने राबविले स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – ‘पवनाकट्टा’ या तरुणांच्या समूहाने पवना नदीपात्रातील जलपर्णी, राडारोडा, गाळ, कचरा हटवून स्वच्छता अभियान राबविले. रावेत, पिंपरी व चिंचवड परिसरात गुरुवारी (दि.08) सकाळी हे अभियान राबविण्यात आले.

पवना नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली होती. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.

नवनाथ भोंडवे, रवींद्र भोंडवे, तानाजी भोंडवे, राजाभाऊ गोलांडे, पवन पवार, शंकर ढोकरे, नंदू भोईर, मिलिंद ढमाले, विश्वास साळुंखे, निखिल भोंडवे या ‘पवनाकट्टा’ समूहातील कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातील जलपर्णी, गाळ आणि कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.