BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : चिंचवडला पवनामाई महोत्सवाचे रविवारी आयोजन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जलपर्णी मुक्त सांडपाणी विरहीत स्वच्छ आणि सुंदर पवनामाई अभियान उगम ते संगम पवनामाई महोत्सव 2019 स्वरसायली प्रस्तुत वेचू शब्दरत्न कार्यक्रम चिंचवडला होणार आहे.

चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात रविवारी दि. 20 जानेवारीला सायंकाळी चार वाजता पाणीदार माणूस पुरस्कार आणि अभियनात सहभागी संस्थाचा सन्मान होणार आहे. यावेळी निवेदक सुप्रसिध्द अभिनेते शंतनु मोघे आणि झी मराठी सारेगमप फेम सायली राजहंस असणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव असून पुरस्कार आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी दिली.

.

HB_POST_END_FTR-A1
.