Pavananagar : ग्रामीण शाळा विद्यार्थ्यांना देते आधुनिकसह कृतीशील शिक्षण -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील शाळा जे नुसतेच पुस्तकी शिक्षण देत नाहीत; तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी अनेक नवीन उपक्रम राबवून आधुनिकतेची कास धरून कृतीशील शिक्षण देते, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

पवना विद्या मंदिर शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ पवनानगर येथे नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बारणे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे हे होते.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळचे आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, उद्योजक सी. एम. शहा, संस्थेचे सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थेचे संचालक मुकुंद खळदे, महेशभाई शहा, यादवेंद्र खळदे, वसंतराव भेगडे, दामोदर शिंदे, सुनिल भोंगाडे,ज्ञानेश्वर ठाकर, असिफ शेख,नारायण कालेकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, मावळच्या शैक्षणिक विकासासाठी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी व सुविधा उपलब्ध करून दिल्यास मावळच्या विकासाची गती वाढू शकते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना कृष्णराव भेगडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

यावेळी संतोष खांडगे बोलताना म्हणाले या शाळेने गेल्या ५० वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी घडवले ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. ५० वर्षांपूर्वी ही शाळा मोठी करण्यासाठी संस्थेबरोबर अनेक शिक्षणप्रेमींचे योगदान आहे. म्हणूनच आज या शाळेत बालवाडी ते वरिष्ठ महाविद्यालय अशा शाखा सुरू असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या सुवर्णमहोत्सवी वर्षात माजी विद्यार्थी, शाळा व संस्था यांच्यातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सन १९६९ ते २०१९ बॅचमधील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या वतीने पवनांकूर ही स्मरणिका प्रकाशित केली.यामध्ये अनेक शिक्षक व माजी विद्यार्थी यांनी आपल्या आठवणी या स्मरणिकेत प्रसिद्ध केल्या आहेत. या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सांस्कृतिक भवन बांधुन देण्यात येणार असून त्यासाठी अनेक माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आर्थिक मदत केली तर पुढील काळात अजून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले.

या समारंभात माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना पवना जीवन गौरव,संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांना पवना कार्य गौरव पुरस्कार,उद्योजक सी. एम शहा यांना पवना ज्ञानसाधना, सुनील भोंगाडे यांना स्फूर्ती गौरव पुरस्कार खासदार बारणे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1