Pune News : भामा-आसखेडमधून पुणे शहराला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा : आमदार चेतन तुपे

मागील भाजप सरकारच्या काळामध्ये व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता आल्यापासून या प्रकल्पाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही तुपे यांनी केला.पुण्याचा पाणीपुरवठा गेली पाच वर्ष सुरळीत होऊ शकला नाही. या दिरंगाईमु

एमपीसी न्यूज – पुण्याला भामा-आसखेडमधून पाणी मिळण्याचा मार्ग आता पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी शासनाने पाणी आरक्षण पुन्हा मंजूर केले आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असल्याची माहिती आमदार चेतन तुपेपाटील यांनी शुक्रवारी दिली.

भाजपच्या काळात रखडलेल्या प्रकल्पाला आता या निर्णयामुळे वेगाने चालना मिळणार आहे. पुढील काळात भामा-आसखेडमधून निश्चित पुण्याला आरक्षित पाणी मिळेल.

अपुरा, कमी दाबाचा पाणीपुरवठा व पाणीटंचाई यामधून पुणेकरांची सुटका होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

भामा आसखेड धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पुणे महानगरपालिकेत असताना घेण्यात आला होता.

परंतु, मागील भाजप सरकारच्या काळामध्ये व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता आल्यापासून या प्रकल्पाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही तुपे यांनी केला.

पुण्याचा पाणीपुरवठा गेली पाच वर्ष सुरळीत होऊ शकला नाही. या दिरंगाईमुळे व भाजपच्या नाकर्तेपणामुळे भामा आसखेड धरणाच्या पुणे मनपा साठी आरक्षित 2.65 टीएमसी पाण्याचा सिंचन पुनर्स्थापना खर्च न भरल्यामुळे पाणी आरक्षण रद्द झाले होते.

पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांना हक्काचे पाणी पुन्हा मिळवून देण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही आमदार तुपे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.