BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पवनेच्या काठावर दिवाळी पहाट उत्साहात

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनतर्फे पवनाकाठ दिवाळी पहाट हा कार्यक्रम सप्तसुरांच्या मैफिलीत संपन्न झाला. ही दिवाळी पहाट आज (मंगळवारी) पहाटे चिंचवड मधील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे पार पडली. कार्यक्रमात मराठी व हिंदी गीतांमधून रसिकांची मने भारावून गेली. 

खासदार श्रीरंग बारणे, योग शिक्षक दिगंबर उचगावकर, माजी महापौर कविचंद भाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आनंद को-हाळे, उमेश गोलांडे, राजाभाऊ गोलांडे, सचिन चिंचवडे, धनाजी बारणे, बशीर सुतार, अविनाश पेटकर आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशन आयोजित दिवाळी पहाट या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात घनःश्याम सुंदरा, या सुखांनो या, तुला पाहिले मी, बगळ्यांची माळ, केंव्हा तरी पहाटे, या जन्मावर, मन मोराचा, कानडा राजा पंढरीचा यांसारखी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते कलाकारांनी सादर केली. संदीप उबाळे, सई तांबेकर, केतन गोडबोले, स्नेहा अस्तूंकर आदींनी गायन केले. चित्रा खरे यांनी निवेदन केले.

कार्यक्रमाचे संयोजन गजानन चिंचवडे, रवी नामदे यांनी केले.सूत्रसंचालन महेश बारसावडे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3