Paytm News : गुगल प्ले स्टोअरवरुन ‘पेटीएम ‘ हटवलं

यासंदर्भात पेटीएमने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एमपीसी न्यूज – ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे ॲप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना या ॲपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही,असं म्हटलं आहे.

गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. यासंदर्भात पेटीएमने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या प्रकरणामध्ये चौकशीनंतर कंपनीकडून अधिकृतपणे पत्रक जारी करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आता फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.

ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते, अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे, असे आमचे नियम आहेत. एखाद्या अ‍ॅपने याचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यासंदर्भातील नियमांची माहिती अ‍ॅपच्या डेव्हलपर्सला देतो. यासंदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अ‍ॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते.

मात्र, अनेकदा सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवणाऱ्या अ‍ॅपवर आम्ही कारवाई करतो. यासंदर्भात आम्ही या कंपनीचे गुगल प्ले डेव्हलपर्स अकाऊंट बंद करण्यासारखी गंभीर कारवाईही करु शकतो.

आपल्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सर्व डेव्हलपर्सला हे नियम लागू होतात,असं गुगलने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.