22.8 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Mobile app Launch: “पीसीईटी – नूतनचे एमएचटी सीईटी मॉक टेस्ट” मोबाईल अप्लिकेशन लाँच

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीइटी टेस्ट सोपी जावी यासाठी पीसीइटी नूतन या संस्थेच्या वतीने(Mobile app Launch) “पीसीइटी नूतन एमएचटी सीइटी मॉक टेस्ट” एप्लीकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली आहे.

 

राज्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांना पुण्यात प्रवेश घेण्याची इच्छा असते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा सोपी जावी आणि परीक्षेचा सराव करता यावा या उद्देशाने 1990 पासून शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एमएचटी सीईटी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत (मॉक टेस्ट) सराव परीक्षा मोबाईल अप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

Shrirang Barne : ‘विद्यार्थी, कामगारांची गैरसोय होतेय, दुपारीही लोणावळा-पुणे लोकल सेवा सुरु ठेवा’

 

या मोबाईल अप्लिकेशन मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांच्या एकूण तीस मॉक टेस्ट उपलब्ध असून, टेस्ट झाल्यानंतर मेल अथवा फोनवर तातडीने विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाठवला जाणार आहे. संबंधित विषयांच्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मॉक टेस्ट तयार करण्यात आली आहे. (Mobile app Launch) या मोबाईल अप्लिकेशन मुळे विद्यार्थ्यांची एमएचटी सीईटी साठी उत्तम तयारी करण्यास सहाय्य होणार आहे. योग्य इंजिनिअरिंग महाविद्यालय निवडण्यासंदर्भात सल्ला केंद्र देखील या मोबाईल अप्लिकेशन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोबाईल अप्लिकेशनचा लाभ घ्यावा असे आवाहन पीसीईटी नूतन चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी केले आहे .

 

spot_img
Latest news
Related news