PCMC :  महापालिका तिजोरीत 1 हजार 863 कोटींचा महसूल जमा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2022-23 या आर्थिक वर्षात महत्वाच्या मिळकत कर, बांधकाम परवाना, अग्निशामक, पाणीपुरवठा, आकाशचिन्ह परवाना (PCMC) या विभागातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले असून पालिका मालामाल झाली आहे. 1 हजार 863 कोटींचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

महापालिकेला मालमत्ता कर विभागातून 810 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यंदा कराच्या वसुलीत 35 टक्के अधिक कर वसूल झाला. बांधकाम परवानगी विभागातून  722 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अग्निशामक विभागातून 238 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Alandi : पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी 5 व 6 एप्रिलला ‘मीडिया रिफ्लेक्शन’ इव्हेंटचे आयोजन

पाणीपुरवठा विभागातून 57 कोटी 58 लाख,  प्राधिकरणाचे भूखंड हस्तांतरण फी, वारस नोंदीतून 15 कोटी, आकाश चिन्ह व परवाना विभागातून 17 कोटी 75 लाख, भूमी व जिंदगी विभागातून (PCMC) 3 कोटी 50 लाख असा 1 हजार कोटी 863 कोटी रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.